#Job

दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बंपर भरती……!

दिल्ली दि.30 – भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास युवकांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागात अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर झाली आहे. दक्षिण रेल्वे विभाग एकूण 3378 पदांवर भरती करणार आहे. रेल्वेमध्ये अप्रेंटिस करण्याची ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यास सुरुवात 1 जूनपासून होणार आहे.

अप्रेंटिस पदासाठी दक्षिण रेल्वे विभागाच्या sr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकतात. उमदेवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचून नंतर अर्ज करावा. निवड झालेल्या उमेदवारांना तामिळनाडू राज्यात काम करावं लागणार आहे.यामध्ये दक्षिण रेल्वे (South  Railway) विभागात 3378 पदावंर अप्रेटिससाठी संधी देण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी अर्ज करणं आवश्यक आहे. अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण आवश्यक असून त्याशिवाय संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण असलेले उमदेवार देखील अर्ज करु शकतात, त्यासाठी फिजीक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा अभ्यास केलेला असणं आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमीत कमी वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्‍यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील केलेली आहे. फ्रेशर्स, आयटीआय आणि लॅब टेक्निशियन यांच्यासाठी वायीच अट 22 वर्ष आहे. तर उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआय मध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

दरम्यान खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 100 रुपये आहे. तर, एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही. इच्छुक उमेदवारांनी रेल्वे विभागाच्या दक्षिण विभागाच्या वेबसाईट www.sr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज सादर करावेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close