व्हायरलब्रेकिंग

बीडमध्ये भावी वकिलांची ‘मास कॉपी’ उघड….!

6 / 100 SEO Score
बीड, दि. २१ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांना ’सरप्राईज’ भेटी देण्याचा धडाका मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी सुरूच ठेवला आहे. पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेत बुधवारी बीड  शहरातील परीक्षा केंद्रास भेट दिली. या भेटीत बीड येथील स्वातंत्र्यसेनानी रामराव सावरगावकर  महाविद्यालयाच्या दोन हॉलमध्ये ‘मास कॉपी’ आढळून आल्याने येथिल सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही मा. कुलगुरू यांनी दिले आहेत.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पव्यूत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा २९ एप्रिल तर सहा मे पासून प्रोफेशनल अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी पदव्युत्तर परीक्षेत २९ एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी बीड शहरातील तीन परीक्षा केंद्राना  ’सरप्राईज व्हिजीट’ दिली. बीड शहरातील बलभीम महाविद्यालय, केएसके महाविद्यालय व आदित्य व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय अशा तीन ठिकाणी भेट दिली. या तीनही ठिकाणी अनुक्रमे १५, १५ व सहा असे ३६ विद्यार्थी नकला करतांना आढळून आले. या विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिका जमा करून घेण्यात आली. तसेच संपुर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही मा.कुलगुरु यांनी दिले.
             तर दुसऱ्या टप्प्यात कुलगुरू डॉ.विजय फुलारी यांनी बीड येथील बार्शी रोडवर असलेल्या स्वातंत्र सेनानी रामराव पाटील विधी महाविद्यालयास शुक्रवारी (दि. २१) दुपारी आकस्मिक भेट दिली. या केंद्रावर मास कॉपी आढळून आली.येथे नकला करताना 53 विद्यार्थ्यांकडून पेपर जमा करून घेण्यात आले. तसेच तीन मोबाईलही जप्त करून केंद्र संचालकाकडे सोपविण्यात आले. कुलगुरूंच्या अचानक भेटीमुळे नव्यानेच रुजू झालेलल्या प्राचार्य, परिवेक्षक व विद्यार्थ्यांची धांदल उडाली.
                        यावेळी भरारी पथकातील डॉ. प्रवीण यन्नावर,  डॉ.भास्कर साठे  व प्रा. सचिन भुसारी हे उपस्थित होते.  तसेच परीक्षा केंद्रातील त्रुटी संदर्भात कारवाई कारण्याचे आदेश दिले.  विधी  महाविद्यालयाच्या दोन हॉलमध्ये ‘मास कॉपी’ आढळून आल्याने येथिल सर्व विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेशही कुलगुरू यांनी परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ बी. एन. डोळे यांना दिले आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close