#Accident

कारमधील एक ठार तर अन्य तिघे जखमी……!

Car - Ambulance accident,One killed, three injured

कडा दि.30 – बीडवरून कोल्हापुर कडे जात असलेल्या भरधाव कारने नगरवरून बीडकडे जात असलेल्या रूग्णवाहिकेला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात कार मधील एक जण जागीच ठार झाला आहे.
           सदर अपघातात अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्याना अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ८:३० दरम्यान बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावर सुर्डी फाटा येथे घडली. अवधुत नंदकुमार गरगटे रा.इचलकरंजी (31) असे अपघात मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुण्याला रूग्ण घेऊन गेलेली रूग्णवाहिका MH.20,EG.5130 ही बीडला जात असताना बीडवरून कोल्हापुर कडे जात असलेली कार Mh.09, Bm.5986 ही भरधाव वेगात असल्याने सुर्डी फाट्यावरील वळणावर समोरासमोर दोनही वाहनाची जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात अवधुत गरगटे हा जागीच ठार झाला असुन अन्य तिघेजण गंभीर जखमी झाल्याने त्याना तातडीने अहमदनगर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
          दरम्यान, रूग्ण वाहिका चालक संतोष सुरवसे रा.बीड हा किरकोळ जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पत्रकार समीर शेख, रेवणाथ खाडे, दत्ता तरटे, पप्पु शिंदे विजय गोल्हार व परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत केली. जखमी झालेल्या तिघांना डॉक्टर राजू झिंजूर्क व संजय गाढवे यांच्या ऍम्ब्युलन्समध्ये नगर येथे पाठवण्यात आले. नाचणी धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आयशा अन्सारी ,अफसर शेख, शेरू शेख, कर्मचारी स्टाफ दाखल झाले, तसेच आष्टी पोलीस प्रशासन श्री. दराडे  व त्यांचा सर्व स्टाफ हजर झाला व पुढील तपास करत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close