#Accident

पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा शेततळ्यात बुडून मृत्यू…….! 

केज तालुक्यातील दुर्दैवी घटना 

1 / 100
केज दि.6 – पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय महिलेचा पाय घसरून शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील लव्हुरी येथे घडली आहे. ज्योती ज्ञानेश्वर चाळक असे शेततळ्यात बुडून मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.
                    लव्हुरी येथील ज्ञानेश्वर चाळक यांची शिवारातील शेत सर्वे १९८ मध्ये जमीन आहे. त्यांची पत्नी ज्योती ज्ञानेश्वर चाळक ( वय २८ ) ही महिला ६ डिसेंबर रोजी सकाळी शेतात गेल्या होत्या. त्या शेततळ्यावर पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेल्या. मात्र शेततळ्यातून पाणी काढीत असताना त्यांचा पाय घसरून शेततळ्यात पडल्या. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे जमादार चाँदपाशा सय्यद, पोलीस नाईक धन्यपाल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने बाजाच्या साहाय्याने ज्योती चाळक यांचा मृतदेह शेततळ्याच्या बाहेर काढला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून या महिलेस दोन मुले आहेत. राजाभाऊ बजरंग चाळक यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार उमेश आघाव हे पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close