गेवराई तालुक्यातील भेंड बु. येथील मयत जयपाल याचे कल्याण येथील एका तीस वर्षीय महिलेसोबत फेसबुकवर प्रेमसंबंध जुळून आले. दोन दिवसांपूर्वीच सदरील महिला कल्याण येथून भेंड येथे आली होती. परंतु रविवारी दि. १६ रोजी सदरील महिलेला पतीने फोन करून गुन्हा दाखल करील असे बजावले असता भीतीपोटी रविवारी मध्यरात्रीनंतर सोमवार दि. १७ रोजी पहाटे घरातील आडुला या प्रेमी युगलाने गळफास घेतला. यावेळी विवाहीत महिलेचा दोर तुटला, मात्र जयपाल वाव्हळ याचा यामध्ये मृत्यू झाला.
दरम्यान, तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सपोनि प्रताप नलघरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. डी. कुवारे पुढील तपास करित आहेत.