#Accident
विहिरीत पडून 48 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू…..!
केज दि.२० – तालुक्यातील सांगवी सारणी येथील एका 48 वर्षीय शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून केज पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील सांगवी सारणी येथील रहिवासी नागनाथ अर्जुन चाळक यांचा दि.१८ ते १९ जानेवारीच्या 12 ते चार च्या दरम्यान भगवान चाळक यांच्या विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान दत्तात्रय अर्जुन चाळक यांच्या खबरेवरून केज पोलीसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक महादेव बहिरवाल हे करत आहेत.