#Accident
वाळूच्या खड्ड्यात बुडून चार बालकांचा दुर्दैवी अंत……!
गेवराई दि.०६ – तालुक्यातील शहजाणपूर चकला येथे वाळूसाठी केलेल्या खड्यात साठलेल्या पाण्यात बुडून चार मुलांचा जीव गेला आहे. सदरील घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.
गेवराई तालुक्यातील मादळमोही जिल्हा परिषद गटातील शहजाणपूर चकला येथील बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर या नऊ ते बारा वर्षे वयाच्या चार बालकांचा खड्यात असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
दरम्यान सिंदफणा नदीत गेल्या अनेक वर्षांपासून सर्रास वाळू उपसा सुरू असल्याने मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.