पुणे दि.१२ – कोव्हिड 19 आपत्तीमध्ये आपल्या विभागात समाजासाठी जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या समस्या, बेरोजगार युवकांना मदत करणे इत्यादी सामाजिक कार्याची दखल घेत राज्य युवा परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने गवंडी समाजातील योध्याना सन्मानित करण्यात आले आहे.
यामध्ये गुरुदेव गवंडी (रोजगार विभाग) विद्याताई गवंडी (महाराष्ट्र पोलिस), प्राणजीत गवंडी (सामाजिक कार्य), गणेश गवंडी (आपत्ती व्यवस्थापन) यांनी केलेल्या कार्याबद्दल राज्य युवा परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. युवा शक्ती, देशभक्ती, राष्ट्रसेवा हे युवा राज्य परिषदचे ब्रीदवाक्य असून निलेशजी थिगळे हे संस्थापक अध्यक्ष आहेत तर प्रवीण प्रधान हे समन्वयक आहेत. त्यांनी वरील सर्व तरुणांचे अभिनंदन केले असून समाजातील फाउंडेशन अध्यक्ष कृष्णा गवंडी, नगर चे अध्यक्ष अविनाश अळंदीकर, नाना शिराळकर सर, नागनाथ मशाळकर, बाळासाहेब शिराळकर, भीमाशंकर गवंडी, सुचित्राताई कणके व गवंडी समाजातील मान्यवरांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.