महाराष्ट्र
मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ…….!
मुंबई दि.२३ – राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची आजा भल्या पहाटे ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली होती. ईडीने नवाब मलिक यांची चौकशी सुरू केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यातच आता नवाब मलिकांच्या मालमत्तेवरून त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधत त्यांनी एका कवितेच्या माध्यमातून भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचं म्हटलं आहे. मात्र, तुम्हाला राष्ट्रवादीचा गडी पुरून उरणार, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत. स्टॅण्ड विथ नवाब मलिक, असा हॅशटॅग देखील त्यांनी वापरला आहे.