#Accident

अखेर ”त्या” अपघातग्रस्त कर्मचाऱ्याचे निधन…..!

6 / 100
केज दि.29 – केज कळंब रोडवर बुध्दसृष्टी जवळ असलेल्या पुलावर मोटार सायकल अपघातात पती-पत्नी जखमी झाले होते. त्या अपघातग्रस्त व्यक्तीचे लातूर येथे शुक्रवारी दि.29 रोजी सकाळी 9.45 दरम्यान निधन झाले.
              दि. १८ एप्रिल सोमवार रोजी केज-कळंब महामार्गावर बुध्दसृष्टी जवळच्या पुलावर कुंबेफळ (ता.केज) येथील सिद्धिविनायक विद्यालयात शिपाई पदावर कार्यरत असलेले काशिनाथ महादेव राऊत वय (४८ वर्ष) व त्यांची पत्नी (४० वर्ष) हे मोटार सायकल क्र (एम एच ४४/डब्ल्यू- ०१७१) साळेगावकडे येत असताना रात्री ९ वा. दरम्यान त्यांचा अपघात झाला होता. अपघातात काशिनाथ राऊत यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला होता. पतीपत्नीवर उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे प्रथमोपचार करण्यात आल्यानंतर काशिनाथ राऊत यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविले होते. मात्र त्या दिवसापासून ते कोमात होते आणि आज अखेर त्यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले.
                दरम्यान, या पुलावर मागच्या अनेक दिवसांपासून रस्ता दुरुस्तीचे काम सुरू होते त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, पाच भाऊ असा मोठा परिवार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close