केज तालुक्यातील सारूळ येथे इंडस कंपनीचे मोबाईल टॉवर आहे. १८ मे रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास टॉवरजवळ कोणी ही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरटे टॉवरवर चढले. त्यांनी आयडिया कंपनीचे रेंज कामी वापरण्यात येणारे ४२ हजार रुपये किंमतीचे आरयुएस कार्ड ( एकूण ७ कार्ड ) काढून घेत पोबारा केला. कंपनीचे अधिकारी शिवलाल मस्साजी जगताप ( रा. भवानवाडी ता. जि. बीड ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार अशोक मेसे हे करीत आहेत.