ब्रेकिंग

केंद्रानंतर राज्यानेही कमी केले पेट्रोल डिझेल चे भाव…..!

6 / 100
 केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे.
        शनिवारी केंद्र सरकराने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली. यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावे, असे आवाहन केले होते. केंद्राने व्हॅटमध्ये कपात केल्यानंतर राजस्थान आणि केरळने आपल्या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात केली होती. यानंतर महाविकास आघाडी सरकारवरही दडपण होते, त्यानंतर आज पेट्रोल-डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला, असं बोललं जात आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर वार्षिक अडीच हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
केंद्र-राज्याचे मिळून पेट्रोल-डिझेलच्या दरात इतक्या रुपयांची झाली कपात
केंद्र आणि राज्य सरकारने कमी केलेल्या करामुळे पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेलच्या दरात 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झाले आहे.
                व्हॅट कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होणार आहे. याशिवाय सरकारने डिझेलवर 1 रुपये 44 पैसे कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे डिझेल प्रति लिटर 95 रुपये 84 पैसे मिळणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close