#blind belief

मांत्रिकाचा अघोरी कारनामा आला समोर…….!

5 / 100
सांगलीतील 20 जून रोजी घडलेल्या खळबळजनक घटनेचं रहस्य उलगडलंय. 9 जणांच्या आत्महत्येची शंका व्यक्त केली जात होती. विष देऊन वनमारे बंधूनी आपलं आयुष्य संपवलं, असं सांगितलं जातं होतं. पण या घटनेच्या सात दिवसांतच पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला. 9 जणांची आत्महत्या नव्हे, तर हत्याच झाली होती, असं पोलीस तपासासून उघड झालं. या धक्कादायक घटनेप्रकरणी पोलिसांनी  केलेल्या खुलाशाने काळजाचा थरकाप उडालाय. मांत्रिकाच्या नादापायी वनमारे कुटुंब उद्धव्स्त झाल्याचं समोर आलं. चकीत करणारी बाब म्हणजे मांत्रिकानं या कुटुंबाला  विष देऊन मारल्याचे समोर आले आहे.
               वनमारे कुटुंबाला मांत्रिकाने त्याच्या ड्रायव्हरच्या मदतीने ठार मारलं. विष कालवून या मांत्रिकानं आणि त्याच्या ड्रायव्हरने हे भयानक हत्याकांड रचलं होतं. अब्बास मोहम्मद अली बागवान असं या मंत्रिकाचं नाव आहे. हा मुख्य आरोपी असून त्याच्या ड्रायव्हरचाही या हत्याकांडात हात आहे. या मांत्रिकाच्या ड्रायव्हरचं नाव धीरज चंद्राक सुरवसे आहे. हा मांत्रिक रदस्यमय खजाना शोधण्यासाठी वनमारे कुटुंबाच्या घरात आला होता. यावेळी त्यानं कुटुंबातील सगळ्यांना गच्चीत पाठवलं. त्यानंतर त्यानं विष दिल्याने एक एक जण बेशुद्ध पडला. बेशुद्ध झालेल्या या घरातील प्रत्येक कुटुंबानं त्याच अवस्थेत शेवटचा श्वास घेतला होता.
             दरम्यान, पोलिसांनी या हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यंची कसून चौकशी केली जातेय. 20 जून रोजी वनमारे बंधूंच्या आत्महत्येनं संपूर्ण म्हैसाळ गाव हादरुन गेलं होतं. 9 जणांचे मृतदेह घरात निपचित पडल्याचं समोर आल्यानंतर गावकरी हादरुन गेले होते. याबाबत नंतर पोलिसांनी कळवण्यात आलं होतं. डॉक्टर आणि शिक्षक बंधूंच्या आत्महत्या झाली असल्याचं समजताच संपूर्ण सांगली हादरलेलील. मात्र ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं पोलिसांच्या तपासातून उघड झालं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close