राजकीय

विश्वासदर्शक ठराव जिंकला, शिवसेनेला आजही एक दुसरा धक्का……!

5 / 100
मुंबई दि.४ – विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत अग्नीपरीक्षा होती. शिंदे सरकार विश्वास ठराव जिंकणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, शिंदे सरकारवरच सभागृहातील आमदारांनी विश्वास दाखल केला. शिंदे यांनी 164 मतांनी विश्वास ठराव जिंकला.
              विश्वासमताच्या बाजूने 164 मते पडली. तर विश्वास ठरावाच्या विरोधात 97 मते पडली. तर कालच्या प्रमाणे आजही तीन आमदार तटस्थ राहिले. कालच्यापेक्षा आज विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आघाडीला 10 मते कमी पडली.शिंदे यांनी विश्वास ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी बाके वाजवून त्यांचं स्वागत केलं. विश्वास ठराव जिंकल्यानंतर आता शिंदे सरकार अडीच वर्षासाठी आपला कारभार करणार आहे. विश्वास ठरावाच्या आधी आज शिवसेनेला मोठा धक्का बसला. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेची साथ सोडून आज शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
             दरम्यान, विधानसभेचं कामकाज बरोबर 11 वाजता सुरू झालं. त्यावेळी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे सभागृहात हजर नव्हते. आदित्य ठाकरे उशिरा सभागृहात पोहोचले. तोपर्यंत आवाजी मतदान झालं होतं. विधानभेचे दरवाजे बंद होत असतानाच ठाकरे सभागृहात आले. गेले 13 दिवश एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला धक्क्यावर धक्के दिले. आजही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना शेवटचा धक्का दिला. गेली 13 दिवस शिवसेनेसोबत ठामपणे उभे राहणारे, शिवसेनेच्या प्रत्येक बैठकांना हजर राहणारे आणि बंडखोरांवर जहरी टीका करणारे शिवसेनेचे हिंगोलीतील आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिंदे गटाकडील शिवसेना आमदारांची संख्या 40 झाली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close