क्राइम

वीस वर्षीय तरुणाची आत्महत्या, केज तालुक्यातील घटना…..!

13 / 100
केज दि.३१ –  बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडावे? तसेच मागील तीन वर्ष सतत नापिकिपीमुळे चिंताग्रस्त असलेल्या वीस वर्षीय भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
              देवगाव ता. केज येथे रविवार दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी २ च्या सुमारास दीपक बालासाहेब मुंडे याने घरातील पत्र्याच्या अडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपक मुंडे याच्या बहिणीच्या लग्नात झालेले कर्ज आणि वडिलांच्या नावे असलेले बँकेचे कर्ज हे सततच्या नापिकीमुळे फेडता येत नसल्याच्या विवंचनेतून दीपक मुंडे याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
                   पांडुरंग रामा मुंडे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रभारी सहाय्य पोलिस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरघाट दूरस्थ पोलिस चौकीचे पोलिस हेडकॉन्स्टेबल अभिमान भालेराव हे तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close