#Social
वर्गमित्रांनी एकत्र येत केली वृद्धाश्रमाला मदत….!
केज दि.११ – येथील वर्गमित्रांनी एकत्र येवून आपला परिवार वृध्दाश्रम, कळसंबर येथे गेट टु गेदर कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी सर्वांनी आजी आजोबां सोबत मन मोकळ्या गप्पा मारल्या. तसेच आपला परिवारच्या कामा विषयी कौतुक करून एक तेल डब्बा, तांदूळ कट्टा, गहू आटा, एक पोते मुरमुरे अशी मदत केली.तर कैलास जाजू यांनी पाच हजार तर निरंजन लोकरे यांनी अकराशे रुपयांची देणगी दिली.
यावेळी निरंजन वसंतराव लोकरे, उदय पद्माकर आनंदगावकर, शुभांगी बाबासाहेब देशमुख, डॉ. सारिका पालवे, राजकन्या महादेव नखाते, मल्लिकार्जुन बसलिंग स्वामी, पवन वल्लभदास जाजु, शंकर ज्ञानोबा ठोंबरे, गौस असरार खुरेशी, कैलास सुरेशचंद्र जाजू, बालाजी आश्रुबा काकडे यांची उपस्थिती होती.