आपला जिल्हा
अकोला येथे झालेल्या पोलीस प्रशिक्षण सत्रात बीडचे शिंदे चमकले…..!


प्रोफेशनल स्किल अपग्रे डेशन-2 मध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील दोनशे पोलिस अंमलदार यांनी प्रशिक्षण घेतले. सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर घेण्यात आलेल्या योगा परीक्षेमध्ये 50 पैकी 46 गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये व जीएसटी तसेच इन डोअर डोअर परीक्षेमध्ये 200 गुणांपैकी 170 गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये व जीएसटी असे दोन बक्षीस बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस ठाणे बीड येथे कार्यरत असलेले पोह परमेश्वर कोंडीबा शिंदे यांनी मिळवले.त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला.