#निधन वार्ता

मयत इसम चार दिवसांपासून होता बेपत्ता….!

6 / 100
बीड दि.२२ – साठवण तलावात आढळून आलेल्या प्रेताची ओळख पटली असून संजय मुरलीधर वावधने (वय 48) रा. धारूर जि. बीड असे मयत तरुणाचे नाव आहे. मयत इसम गेल्याकाही दिवसांपासून बेपत्ता होता. नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. ( Suicide due to depression; ‘That’ body was identified.)
                 धारुर Dharur शहराच्या पश्चिमेस बालाघाट डोंगर रांगेत साठवण तलावात आज दि.22 मे सोमवार रोजी सकाळी पाण्यात पुरुष जातीचे प्रेत तरंगत असल्याचे आढळून आले. धारुर किल्ल्याच्या पाठीमागील डोंगरात शहराच्या जवळ असलेल्या या
तलावावर अनेक जण सकाळी पोहोण्याचा आनंद घेतात. यापैकी काहींच्या निदर्शनास प्रेत आल्यानंतर शहरात याची चर्चा सुरु झाली. चर्चेनंतर पोलीसांनी Police घटनेचा पंचनामा केला. तपासानंतर सदर प्रेत हे शहरातील जोडआड गल्लीत राहणाऱ्या संजय मुरलीधर वावधने यांचे असल्याचे निष्पन्न झाले.
                                  सदर इसम गेल्या चार दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. नैराश्यातून त्याने साठवण तलावात आत्महत्या suicide केल्याची प्राथमिक माहितीतून समोर आली आहे. उत्तरीय तपासणीनंतर प्रेत नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close