ब्रेकिंग

डेंग्यूने घेतला 14 वर्षीय बालकाचा बळी……!

7 / 100
केज दि.16 – dengue fever  मुळ धारूर येथील रहिवासी असलेल्या 14 वर्षीय मुलाचा केज शहरात डेंग्यूची लागण झाल्याने अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. ( Beware of dengue fever… 14-year-old boy of Dharur dies of dengue in a Kaij.)
              धारुर Dharur येथील मुळ रहिवासी असलेले आवेज इब्राहिम शेख हे गेल्या काही दिवसांपासून केज Kaij येथील क्रांती नगर भागात राहत आहेत. आवेज शेख यांच्या अनस आवेज शेख (वय 14) या मुलास गेल्या काही दिवसांपासून तापीची लागण झाली. खाजगी दवाखान्यात उपचारानंतर त्या मुलास डेंग्यू dengue fever झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर केजच्या Kaij उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने मुलास अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. रुग्णालयात पाठवण्यात आले.
            दरम्यान मात्र दि.15 ऑगस्ट 2023 मंगळवार रोजी उपचार सुरु असताना रात्री साडेनऊच्या सुमारास त्याचे निधन झाले. त्याच्या अकाली निधनामुळे धारुरसह केजमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. सध्या डेंग्यूचे रुग्ण वाढत असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close