#Crime

बीड जिल्ह्यात गुन्हेगारांचे धाडस वाढले, थेट पोलीस पथकावर हल्ला….!

6 / 100
बीड दि.11 – जिल्ह्यात वाळू माफियांना सळो की पळो करून सोडणारे पोलीस अधिक्षक पथक प्रमुख, सपोनि गणेश मुंडे व एका पोलीस कर्मचाऱ्यावर वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ६ च्या सुमारास घडली.एसपींच्या पथकावरच थेट असा हल्ला करण्यात आल्यामुळे वाळू माफियांचा मुजोरीपणा पुन्हा  एकदा चव्हाट्यावर आला आहे.
    बुधवारी पहाटे गणेश मुंडे व पोलीस कर्मचारी श्री.वायबसे म्हाळसपिपंळगावच्या वाळू साठ्याची पाहणी करून  राक्षसभुवनकडे जात होते. यावेळी सकाळी ६ च्या सुमारास राक्षसभुवन फाट्यावर काळ्या रंगाची स्कर्पिओ  विनानंबरची थांबलेली होती. सदर गाडी गणेश मुंडे यांच्या कारचे लोकेशन घेत निघालेली होती. राक्षसभुवन फाट्यावर मुंडे यांनी त्या स्कर्पिओला हात दाखवून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता त्या गाडीतील चालकाने गणेश मुंडेंच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी गाडीने दिलेल्या धडकेत मुंडे यांच्या पायाला आणि हाताला जबर मार लागला आहे. तर वायबसे हे पोलीस कर्मचारीही या घटनेत जखमी झाल्याची माहिती आहे. सदर प्रकरणातील आरोपी हा जालना जिल्ह्यातील गोंदी येथील असल्याची माहिती असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचे कळते.
                                  दरम्यान गणेश मुंडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. माफियांचा मुजोरपणा मोडीत काढणे आता पोलिसांसमोर एक आव्हान असणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close