आपला जिल्हा

केज पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून सन्मानीत….!

6 / 100 SEO Score
केज दि.११ – येथील पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना पोलीस अधीक्षक कार्यालय बीड यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे केज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
          मागच्या काही दिवसांपूर्वी केज शहरांमध्ये कानडी रोड येथे एका पिडीत इसमाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात गंभीर जखम करून खुन केला होता. या गुन्ह्यामध्ये केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.पवार, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस नाईक, दिलीप गित्ते व पोलीस हवालदार बाळासाहेब अहंकारे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केवळ 12 तासांमध्ये अज्ञात आरोपीस अटक करून मा. न्यायालयासमोर हजर केले होते. या विशेष कामगिरीमुळे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
          दरम्यान, पुढील काळात अशीच विशेष कामगिरी करून पोलीस दलाचे नावलौकिक वाढवतील असा विश्वास व्यक्त केला आहे.याकरिता केजचे पोलीस निरीक्षक श्री.पवार व सर्व कर्मचार्‍यांचे केज शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close