ब्रेकिंग

केज बसस्थानकातून पुन्हा एका महिलेच्या पर्समधील सोन्याच्या दागिन्यावर डल्ला….!

6 / 100
केज दि.२८ – केज बसस्थानका बसमध्ये चढताना एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असून पुन्हा प्रवाशांना लुटणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
              कळंब तालुक्यातील इटकुर येथील एक महिला सासुसह दि.२८ रोजी दुपारी नेकनूरला देवदर्शनासाठी जाण्यासाठी केजच्या बसस्थानकात आली होती.सदर महिला उदगीर – संभाजीनगर बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले दिड तोळ्याचे गंठन चोरून पोबारा केला. सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बसचे वाहक व चालक यांना कल्पना दिली. त्यामुळे सदरील बस पोलीस ठाण्यात आणून बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेतली मात्र गंठण सापडले नाही.त्यामुळे सोने घेऊन कुणीतरी बसस्थानकातूनच पसार झाले असावे.
              मागच्या कांही महिन्यांपूर्वीही असे प्रकार वारंवार घडल्याने बसस्थानकात पोलीस चौकी उभारण्याची मागणी झाल्याने पोलीस चौकी सुरूही केली. परंतु सदरील चौकी नेहमीच बंद राहत असल्याने चौकी म्हणजे ”असून अडचण नसून खोळंबा” झाली आहे. बसस्थानकात अशा घटना घडल्यानंतर वेळेवर मदत मिळत नसेल तर काय उपयोग ? असा सवाल उपस्थित होत आहे.त्यामुळे सदरील चौकीत कायम एक पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे.

               दरम्यान, सदरील महिला बसची वाट पाहत असताना त्याठिकाणी तोंडाला पांढरा स्कार्फ बांधलेली महिला येऊन ”एवढे सोने गळ्यात घालून प्रवास करू नका, ते पर्समध्ये ठेवा” असे म्हणल्याचे दागिने चोरी गेलेल्या महिलेने  सांगितले. त्यामुळे ती तोंडावर स्कार्फ बांधून सांगणारी महिला कोण ? याचाही तपास करणे आवश्यक आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close