#Accident

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक….!

9 / 100

केज दि.५ – धारूर रोडवरील नेहरकर पेट्रोल पंपाच्या समोर अज्ञात वाहनाने दुचाकी ला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकी वरील पती – पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडली.

            धारूर तालुक्यातील आवरगाव येथील घनश्याम ऋतू पद्म शिंदे वय 40 हे आणि त्यांच्या पत्नी हे केज कडून धारूर कडे रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान निघाले होते.
                      दरम्यान भवानी मंदिराच्या थोडेसे पुढे गेल्यानंतर एका पेट्रोल पंपाच्या समोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये घनश्याम शिंदे यांच्या पायाला, डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या आहेत. सदरील अपघाताची माहिती मिळताच 108 ची रुग्णवाहिका त्या ठिकाणी तात्काळ पोहोचली आणि जखमींना उपचारार्थ हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर लातूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close