#Job

विजमिटर रीडर यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा…!

6 / 100
केज दि.३१ – महाराष्ट्रात डिजिटल वीजमीटरला विरोध होत असताना महावितरण कंपनी जबरदस्तीने डिजिटल वीजमीटर लावत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. डिजिटल वीजमीटर लावल्यास तालुक्यातील अनेक संघटना रस्त्यावर उतरणार आहे.
        अंबाजोगाई येथील एमएसईडीसीएल मीटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेने उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. कंत्राटी कामगार मागील १५ ते २० वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत असून मीटर रिडींग व बिल वाटपाचे काम करीत आहे.केंद्र, राज्य सरकार आणि महावितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्मार्ट मिटर बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. परंतु, हिवाळी अधिवेशनात तत्कालीन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाही असे विधानपरिषदेत लक्ष्यवेधीत जाहीर केले होते. परंतु, आता सध्या फॉल्टी मिटर बदलण्याच्या नावाखाली स्मार्ट मिटर बसविण्याचे काम वेगाने सुरु आहे. मागील १५ ते २० वर्षांपासून कंत्राटी कामगारांनी पूर्णवेळ या
कामाला दिल्यामुळे या कामाशिवाय दुसरा कुठलाही उदरनिर्वाहाचा मार्ग त्यांच्याकडे शिल्लक नाही. काम बंद झाले तर त्यांचे संपुर्ण कुटुंब रस्त्यावर येईल, रोजगाराचा विचार न करता स्मार्ट मिटर बसविण्याचे काम सुरु राहील्यास दि. १ फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
        दरम्यान, कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे. यावेळी बनेश्वर रुपणार, अशोक अंबाड यांच्यासह बहुसंख्य कामगारांची उपस्थिती होती.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close