यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हनुमंत सौदागर हे होते. तर प्रा. जयश्री कचरे, प्रा.उषा बलाढ्ये, सुजित नाईकवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. सौदागर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनातील बी. एड्. वर्ष हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे वर्षे जीवनाची दिशा ठरवणारे असून आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देणारे असल्याचे सांगितले.
सूत्रसंचालन विलास कांबळे यांनी तर आभार पूजा भोसले यांनी मानले. यावेळी बीएड अध्यापक छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.