#Accident

केज तालुक्यावर शोककळा, तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन…..!

6 / 100 SEO Score
केज दि.९ – केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये ते एकटेच होते आणि गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटून पलटी झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज रेणापूर पोलिसांनी वर्तविला आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. एका कार्यक्षम आणि तरुण अधिकाऱ्याच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनासह संपूर्ण केज तालुक्यावर मोठी शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मैत्री जपणारा माणूस गेला….!

राकेश गिड्डे केजला रुजू झाल्यानंतर कामाचा धडाका उठवत असतानाच मैत्रीचा गोतवाळाही जमला होता. वैद्यकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि अन्य क्षेत्रातील समाजशील व्यक्तींबरोबर मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. परिस्थितीची जाणीव असलेला व्यक्ती म्हणून त्यांनी आपले वलय निर्माण केले होते.एवढेच नव्हे तर क्रिकेट खेळणे हा छंदही त्यांनी जोपासला होता.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close