#Social
भीमरूपी सूर्याच्या किरणांनी माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य दिले – भारत बडे

धारूर/विशेष प्रतिनिधी: आज 14 एप्रिल अथांग ज्ञानाचा सागर..! कुशाग्र बुद्धिमत्तेचे महामानव..! ज्ञानाचे विश्वविभूषित..!घटनेचे शिल्पकार..! तथा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा थेटेगव्हाण ता.धारूर जि.बीड आयोजित केलेल्या जयंतीच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहिती सांगताना वरील संवाद साधला.कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री सखाराम वनवे सर,अधीक्षक श्री.व्ही व्ही कुलकर्णी,पत्रकार श्री.भारत बडे,श्रीमती.पूनम लांब मॅडम या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.डॉ आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठे लिखित संविधानाची रचना करून सर्वसामान्य माणसाला माणूस म्हणून,जगण्याचे स्वातंत्र्य व संविधानाच्या माध्यमातून भारतातील सर्व समाज बांधवांना त्यांचे हक्क,अधिकार आणि स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता यांची बीजे समाजामध्ये आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून पेरली. त्याचे स्वरूप आज आपला देश विश्वगुरू, जगामध्ये सर्वात शक्तिशाली होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्या दिशेने वाटचाल करावी असे प्रतिपादन पत्रकार भारत बडे यांनी जयंतीच्या प्रसंगी केले. मुख्याध्यापक श्री.सखाराम वनवे सर,तसेच शाळेतील अधीक्षक श्री.विनायक कुलकर्णी सर यांनी सुद्धा..!विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.दुर्गा सोनुळे,पूजा साबळे,गोपाल कोकाटे,अश्विनी फुफाटे,पूनम पांढरे अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा…! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वाचनाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली.या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर प्रकल्पाच्या प्रकल्पा अधिकारी श्रीमती चेतना मोरे तसेच पालक अधिकारी डॉ.उद्धव वायाळ सर,शाळेचे मुख्याध्यापक श्री.सखाराम वनवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.