आरोग्य व शिक्षण
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी…..!

बीड दि. ३० – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तारीख निश्चित झाली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आता सर्वात आधी बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल येत्या शनिवार २ मे रोजी जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल कुठे पाहायचे याची वेबसाईट जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा संपल्यानंतर आता निकालाची उत्सुकता लागून राहिली होती. बारावीच्या निकालाबद्दल चर्चा सुरू असतानाच आता बारावीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. बारावीच्या परीक्षांचे निकाल २ मे रोजी जाहीर केले जाणार आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर दहावीच्या परीक्षांसाठी १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
दरम्यान, बारावीच्या परीक्षांचे निकाल येत्या २ मे रोजी जाहीर होणार आहेत. सकाळी ११ वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यात हे निकाल जाहीर करण्यात येतील. दुपारी १ वाजल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ऑनलाईन पाहाता येणार आहेत. mahahsscboard.in या संकेतस्थळावर बारावीचे निकाल पाहण्याची सोय करण्यात आली आहे.