#Accident

भरधाव पिकअपची धडक; रस्ता कडेला उभ्या असलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत…..!

10 / 100 SEO Score
केज दि. ४ – केज-धारूर महामार्गावर गुरुवारी (दि. ३ जुलै) सायंकाळच्या सुमारास एका भरधाव आणि मद्यधुंद चालकाच्या पिकअप वाहनाने रस्ता कडेला उभ्या असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैभव इंद्रमोहन कराड (वय २६, रा. तांबवा) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेने तांबवा परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव कराड हे काल सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास तांबवा शिवारातील आपल्या शेताजवळ, केज-धारूर महामार्गाच्या (क्र. ५४८-सी) कडेला उभे होते. दरम्यान, केजकडून धारूरच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप (क्र. MH 44/U 2270) चालकाने आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने रस्ता कडेला उभ्या असलेल्या वैभव यांना जोरदार धडक दिली.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ जखमी वैभव यांना मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस कारवाई
अपघाताची माहिती मिळताच केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेली पिकअप आणि चालक दोघांनाही ताब्यात घेतले आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून निष्पाप तरुणाचा बळी घेतल्याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
शिक्षण क्षेत्रातील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
मयत वैभव कराड हे साने गुरुजी निवासी विद्यालयाचे कर्मचारी इंद्रमोहन कराड यांचे सुपुत्र होते. हे विद्यालय उद्धव कराड यांच्या पुढाकाराने ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी चालवले जाते. वैभव यांच्या निधनाने कराड कुटुंबियांसह शिक्षण क्षेत्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close