#Social

प्राचार्य अनंत काळे यांना ‘लायन्स सेवा गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान…..!

9 / 100 SEO Score

परभणी दि. ९ – ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार, सामाजिक प्रबोधन आणि बालविवाह रोखण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे लिमला (ता. पूर्णा, जि. परभणी) येथील जय किसान विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. अनंत जिजाबाई वैजनाथराव काळे यांना लायन्स क्लब परभणी प्रिन्स तर्फे “लायन्स सेवा गौरव पुरस्कार – २०२६” देऊन सन्मानित करण्यात आले. परभणी येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात १ ऑगस्ट २०२६ रोजी हा गौरव पुरस्कार आणि सन्मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना केवळ कर्तव्य न बजावता ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनंत काळे यांनी अथक प्रयत्न केले आहेत. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अडचणींमुळे शिक्षणापासून दूर जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांनी आशेचा दीप प्रज्वलित केला.

विशेषतः परिसरातील अल्पवयीन मुलींचे बालविवाह थांबवण्यासाठी त्यांनी केलेले प्रबोधन, पालकांशी साधलेला सातत्यपूर्ण संवाद आणि समाजात निर्माण केलेली जनजागृती यामुळे अनेक मुलींना शिक्षणाची संधी मिळाली. “एका मुलीचे शिक्षण म्हणजे संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचा पाया असतो” हे मूल्य त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.

त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय आणि प्रेरणादायी योगदानाची दखल घेऊन लायन्स क्लब परभणी प्रिन्स परिवार तर्फे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार म्हणजे शिक्षण आणि समाजसेवेचा सुंदर संगम असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा आणि ग्रामीण भागातील प्रत्येक शिक्षकाचा गौरव आहे, अशी भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.

या सन्मान सोहळ्याप्रसंगी लायन्स क्लब परभणी प्रिन्सचे अध्यक्ष ला. डॉ. सूर्यकांत देशमुख, सचिव ला. विकास मस्के, कोषाध्यक्ष ला. नरहरी फड आणि क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. अनंत काळे यांनी भविष्यातही शिक्षण, समाजप्रबोधन व मानवसेवेच्या क्षेत्रात असेच समर्पित भावनेने कार्य करत राहावे, अशा मनःपूर्वक सदिच्छा सर्व उपस्थितांनी दिल्या.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close