#Accident
कार अपघातात दोघे ठार, एक जखमी……!


केज येथून जवळबनच्या दिशेने कारमधून तीन मित्र प्रवास करत होते. कार चंदन सावरगाव शिवारातील सुतार शेत परिसरात आली असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार केशव खाडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. जखमींना रुग्णवाहिकेतून स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून प्रमोद उर्फ सुंदर उत्तम सातपुते (वय ४५, रा. जवळबन) व प्रशांत उर्फ महादेव दिगंबर करपे (वय ४८, रा. जवळबन) या दोघांना मृत घोषित केले. तर दत्ता तपसे (वय ४३, रा. चंदन सावरगाव) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जमादार केशव खाडे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात हलवणे शक्य झाले. अपघातात ग्रस्त झालेले वाहन रस्त्यावर आडवे पडल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.