#Accident
उमरी टोलनाक्याला ट्रकची धडक…..!


कर्नाटक राज्यातील नंदीबिजलगाव (जि. बिदर) येथील चालक रोहिदास गुंडेराव राठोड हा आपला मालवाहतूक ट्रक (के. ए. ५६ – ९४१९) घेऊन जात होता. उमरी फाट्याजवळील टोलनाक्यावर आला असता, त्याने ट्रक भरधाव व निष्काळजीपणे चालवून बूथ नंबर ७ च्या एव्हीसी सेंसरला जोरदार धडक दिली.
याप्रकरणी टोलनाका कर्मचारी प्रीतम गौतम साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात ट्रक चालक रोहिदास राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार प्रल्हाद चव्हाण करत आहेत.