#Crimeक्राइम

चालवतो ट्रक अन लावतो कमरेला गावठी कट्टा…..!

9 / 100 SEO Score

बीड दि. ४ – शहर आणि परिसरात अवैध हत्यारांची तस्करी व हालचाली रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत एका ट्रक चालकाला रंगेहाथ पकडले आहे. त्याच्या ताब्यातून ५४ हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा (पिस्टल) आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

बीड येथील जालना रोडवरील रिलायन्स मॉलजवळ एक इसम कमरेला गावठी कट्टा लावून संशयास्पद रितीने फिरत असल्याची गुप्त बातमीदाराकडून स्थानिक गुन्हे शाखेला खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. यावेळी सत्यम अशोक कासार (वय २३, रा. अस्तीगाव, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले.त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे अवैध गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज जारवाल, दीपक खांडेकर, गोविंद राख, आनंद मस्के, भागवत शेलार, गणेश हांगे व सारणीकर यांच्या पथकाने पार पाडली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close