#Social

१२ व्या संत नामदेव ‘घुमान’ यात्रेची जय्यत तयारी….!

9 / 100 SEO Score

 सहभागी होण्याचे नानक साई फाऊंडेशनचे आवाहन

नांदेड दि. ८ – महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन आणि संस्कृतीचा अनुभव देणाऱ्या १२ व्या ‘संत नामदेव’ घुमान यात्रेची जय्यत तयारी झाली असून, आतापर्यंत सुमारे १८० भाविकांनी नावनोंदणी केली आहे. १५ ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे (९८२३२६००७३) यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

ही यात्रा पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि चंदीगड या राज्यांमधील प्रमुख धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचा दौरा करणार आहे. यात श्री क्षेत्र घुमान, सुवर्णमंदिर, वाघा बॉर्डर, जालीयनवाला बाग, कुरुक्षेत्र, भाक्रा नांगल धरण, आनंदपूर साहिब आणि शक्तिपीठ माता नैना देवी यांसारख्या अत्यंत पवित्र व ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन घडवले जाणार आहे. या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नानक साई फाऊंडेशनच्या वतीने उपाध्यक्ष सुभाष बल्लेवार, माधवराव पटणे, सतीश देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close