क्रीडा व मनोरंजन

केज तालुक्यातील माळेगाव येथे तुळजाभवानी मातेची कोजागिरी यात्रा उत्साहात…..!

9 / 100 SEO Score

केज दि. २६ –  तालुक्यातील माळेगाव येथे ग्रामदैवत श्री तुळजाभवानी मातेची कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यात्रा रविवारी (दि. २५) उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त पहाटे देवीचा अभिषेक व अलंकार महापूजा करण्यात आली. दर्शनासाठी पंचक्रोशीतून हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

यात्रेतील मुख्य आकर्षण म्हणजे, सलग पाच दिवस निरंकार उपवास करणारे भक्त प्रकाश (बापू) गव्हाणे यांनी नागरिकांनी भरलेल्या आणि एकमेकांना दोरखंडाने बांधलेल्या तब्बल १३ बैलगाड्या ओढल्या. ‘आई राजा उदो उदो’च्या गजरात पार पडलेला हा थरारक सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

याशिवाय रात्री ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. भाविकांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले, तसेच माजी सैनिक ब्लड बँक, बीड यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. आकर्षक विद्युत रोषणाई, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि विविध मनोरंजनाच्या साधनांमुळे यात्रा आनंदात पार पडली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close