परभणी | ग्रामीण भागात खासकरून पावसाळ्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली पहायला मिळते. यातच जिंतूर तालुक्यातील पिंप्राळा गावात रस्ता नीट नसल्याने एका तरूणाला चक्क आजारी आजीला तीन किलोमीटर पाठीवर घेऊन जावं लागलंय.
पिंप्राळा गावातील 85 वर्षीय कौसाबाई चाफे यांना अचानक त्रास सुरु होऊन जुलाब आणि उलट्या झाल्या. गावात खासगी ठिकाणी इलाज करुन देखील त्यांच्या तब्येतीत काडीमात्र फरक पडला नाही.अखेर या आजीचा नातू राजकुमार चाफेने (18) तिला कापडाने पाठीवर बांधलं आणि पुढील उपचारांसाठी जिंतूरला नेण्याचं ठरवलं. यासाठी राजकुमार आजीला घेऊन चिखल तुडवत तब्बल तीन किलोमीटर पायीच गेला.