शेती

पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना मिळणार ”एवढ्या” कोटींची मदत…….आदेश जारी……!

मुंबई | राज्यात जून-ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले होते. या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याचे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.

राज्य सरकारने आज याच वचनाची पूर्तता केली असून अतिवृष्टीग्रस्तांना पहिल्या टप्प्यातील मदत म्हणून 2 हजार 297 कोटी 6 लाख  27 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.पहिला हप्ता वितरित करण्याचे आदेश राज्याच्या महसूल व वन विभाग यांच्याकडून काढण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा होणार आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेती व बहुवार्षिक पीकांचे किमान 33 टक्के नुकसान अशा बाधित शेतकऱ्यांना जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पीकांसाठी 25 हजार रुपये प्रतिहेक्टरच्या मर्यादा देण्यात आल्या आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close