राजकीय
”त्यांच्या” डोक्यावर परिणाम झालाय, शॉक दिल्याशिवाय बडबड बंद होणार नाही……!
बीड – सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांचे बेताल वक्तव्य थांबणार नाहीत, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलाय.
त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांनी ठाण्यातील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. त्यांची ही बडबड शॉक दिल्याशिवाय थांबणार नाही, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.ठाकरे कुटुंबीयांच्या पायाजवळ बसून सोमय्या खासदार झाले. आज ते ठाकरे कुटुंबावरच टीका करत आहेत. हा माणूस प्रचंड एहसान फरामोश आहे, अशी सडकून टीकाही गुलाबराव पाटील यांनी केलीय.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कथित जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.
दरम्यान भाजप शिवसेनेत चांगली जुंपली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमय्या यांना शिखंडी म्हणून उपाधी दिली असून संजय राऊत यांनीही तोंडसुख घेतले आहे.तर सोमय्या यांनीही संजय राऊत यांना थेट आव्हान दिल्याने ऐन दिवाळीत राजकिय फटाके फुटत आहेत.