महाराष्ट्र
बीड जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का………!
बीड- ज्येष्ठ नेते माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी मंगळवारी भाजपच्या सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे नाराज झालेल्या जयसिंगराव गायकवाड यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्यामुळे पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे