क्राइम
केज शहरात नव्यानेच सुरू होत असलेल्या पेट्रोल पंपा वरून अडीच लाखाच्या डिझेलची चोरी
केज दि.28 – शहरात नव्याने सुरू होत असलेल्या पेट्रोल पंपाच्या डिझेल टाकीच्या टेस्टिंगसाठी ठेवलेले २ लाख ३३ हजार २३१ रुपयांचे ३ हजार लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरात धारूर रस्त्यावर नितीन धनराज नेहरकर यांच्या नव्याने सुरू होत असलेल्या सुयश नावाच्या पेट्रोल पंपाचे काम अंतिम टण्यात आहे. पेट्रोल पंपावर बसविण्यात आलेल्या डिझेल टाक्यांची टेस्टिंग करण्यासाठी एचपी कंपनीकडून त्यांनी ३ हजार लिटर डिझेल मागवून टाक्यात सोडले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून पाईपच्या मदतीने दूरवर उभ्या केलेल्या वाहनातील टाक्यात काढून घेत दोन लाख ३३ हजार २३१ रुपयांचे एकूण तीन हजार लिटर डिझेल चोरून नेल्याची घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता उघडकीस आली. नितीन नेहरकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.