क्राइम

केज शहरात घरफोडी ; रोख रक्कमेसह दागिने लंपास…..! 

केज दि.१ – घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून  दोन तोळ्याचे गंठण आणि नगदी २५ हजार रुपये असा ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना केज शहरातील वकीलवाडी भागातील शाहूनगरमध्ये घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
        केज शहरातील वकीलवाडी भागातील शाहूनगरमध्ये काजल मयूर अंधारे यांचे घर आहे. अंधारे यांचे कुटुंब ३० डिसेंबर रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. त्यानंतर त्यांच्या घरी कोणीच नसल्याची संधी साधून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घराची झडती घेऊन घरातील ४० हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे पट्टीचे गंठण आणि नगदी २५ हजार रुपयांची रक्कम असा ६५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. काजल अंधारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन हे पुढील तपास करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close