#Social

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीचा मृत्यू,…………तर पतीनेही सोडला प्राण………!

जळगाव दि.३ – शुक्रवारी जळगावातील धरणगाव तालुक्यातील पाळधीमध्ये प्रेमविवाह करून घरी परतलेल्या तरुणीचा दुसऱ्याच दिवशी सासरी मृत्यू झाला. तर तरूणीच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता तिच्या पतीचा देखील मृत्यू झाला आहे.प्रशांत पाटील असं या तरूणाचं नाव आहे. प्रशांत यांचा रूग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

आरती भोसले आणि प्रशांत पाटील यांचं एकमेकांवर प्रेम होतं तर दोघेही काही दिवस बेपत्ता होते. त्यानंतर ते थेट लग्न करून घरी परतले होते. दोघांच्याही कुटुंबाने पोलिसांसमोर त्यांच्या विवाहाला मान्यता देत वाद मिटवला होता.

दरम्यान लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आरतीचा संशयास्पद मृत्यू झाला. विषबाधा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. प्रशांत पाटील यानेही विषारी औषध घेतल्याने त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याच्याही उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close