महाराष्ट्रराजकीय

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून योग्य निर्णय घेतला जाईल – शरद पवार

पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल

बीड दि.१४ – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांची सविस्तर माहिती मला दिली असून सदरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे पक्ष म्हणून आम्हाला तात्काळ कांही निर्णय घ्यावे लागतील असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
        सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर माहिती दिली.
        दरम्यान विरोधकांच्या बाजूने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंडे यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून तात्काळ निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासमोरील अडचणी वाढत जात असून ते राजीनामा देतील अशी चर्चा सुरू आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close