आरोग्य व शिक्षण

दहावी आणि बारावीच्या परीक्षा संदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांचे महत्वाचे वक्तव्य…….!

मुंबई दि.२१ – दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा महत्वाची आहे. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायच्या याचा आढावा आम्ही पुढील बैठकीत घेऊ. परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरू आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षेचं स्थानिक पातळीवर नियोजन केलं जाईल. येत्या 2 फेब्रुवारी किंवा 3 फेब्रुवारीला बैठकीत नियोजन करुन चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असं बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटच्या आठवड्यात घेण्याचा विचार सुरू असल्याचं वर्षा गायकवाड यांनी याआधी म्हटलं होतं. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close