क्राइम

केज शहरात भर दिवसा घरफोडी आठ तोळे दागिन्यांसाह रोख रक्कमेवर डल्ला……..!

दिवसा घरे फोडून चोरट्यांचे पोलिसांना आव्हान

केज दि.२७ – मागच्या कांही महिन्यांपासून शहरात अधूनमधून चोरीचे सत्र सुरू झाले आहे. चोरांना कसल्याच प्रकारची जरब न राहिल्याने भर दिवसा घरे फोडण्याचे धाडस होताना दिसत आहे. अश्याच प्रकारची घटना प्रजासत्ताक दिनी शहरात घडली असून खानावळ चालकाचे घर फोडून आठ तोळे सोन्याचे दागिने व नगदी 10 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
         शहरातील मध्यवर्ती भागातील इरिगेशन ऑफिस च्या पाठीमागे लागून असलेल्या असलेले अरुण धारूरकर यांची बीड रोडवर खानावळ आहे. मंगळवारी दि.२६ रोजी ते व त्यांची पत्नी हे नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून सकाळी 9 वाजता खानावळ उघडण्यास गेले. मात्र दुपारी बारा वाजता त्यांच्या मुलाचे आधारकार्ड आणण्यासाठी सविता धारूरकर ह्या घरी गेल्या असता त्यांना घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले.
        दरम्यान त्यांनी घरामध्ये पाहिले असता कपाटात ठेवलेले तीन तोळ्यांचे गंठन, 22 ग्राम चे मिनी गंठन, 8 ग्राम चे झुंबर, 5 ग्राम चे वेल, 3 ग्राम ची ठुशी असे एकंदर 8 तोळे सोने व रोख 10 हजार रुपये कपाटात साडीखाली ठेवलेल्या चवीने लॉकर उघडून घेऊन गेल्याचे निदर्शनास आले. सदरील प्रकरणी सविता अरुण धारूरकर यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
         मात्र भरदिवसा आणि भरवस्तीत असे प्रकार घडू लागल्याने नागरिक भयभीत झाले असून पोलिसांपुढे मात्र आव्हान उभे राहिले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close