#Vaccination

लहान मुलांसाठीच्या कोरोना लसी बाबत सिरम चा मोठा दावा………! जाणून घ्या कधी येणार लस..…..!

मुंबई दि.31 – सध्या सर्वत्र कोरोना लसीचे डोस आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. त्यानंतर इतर घटकांना लस दिली जाईल. मात्र लहान बालकांना ही लस लागू होत नाही. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावातून लहान मुलांना वाचवण्यासाठी आता लवकरच कोरोनाची लस तयार होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं हा दावा केला आहे. EXIM ग्रुपचे संचालक पीसी नांबियार यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लवकर लहान मुलांसाठी कोरोना लस तयार केली जाणार आहे. ऑक्टोबरपर्यंत ही लस तयार होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही लस 1 महिन्याच्या बाळालाही दिली जाऊ शकणार आहे.

कोचीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नांबियार यांनी सांगितलं की ही लस आल्यानंतर मुलांना मोठा फायदा होणार आहे. ही लस पुढे चालून लहान मुलांसाठी कोरोनावरील औषध म्हणूनही काम करेल, असंही नांबियार म्हणाले. म्हणजे जर तुमच्या लहान मुलाला कोरोनाची बाधा झाली असेल तर ही लस तुम्हाला कोरोनापासून वाचवेल.

दरम्यान पीसी नांबियार यांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीची क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. नियोजनानुसार सर्वकाही ठीक पार पडलं तर ऑक्टोबरपर्यंत लस तयार होईल आणि वर्षाच्या अखेरपर्यंत ती मुलांना देण्यास सुरुवात होईल.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close