आठ दिवसांच्या फरकाने तीन सख्या भावांचा कोरोनाने मृत्यू…….!
पुणे दि.२८ – काही दिवसांच्या विश्रांतीनंतर दौंड तालुक्यात कोरोना संर्सगाने पुन्हा जोमाने डोकेवर काढले आहे. दौंड तालुक्यातील पाटस परिसरात कोरोना संसर्ग रुग्णांचा आलेख वाढत चालला आहे. मागील वीस दिवसात परीसरात तब्बल २१ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी मागील आठदिवसात कोरोना संसर्गबाधित तीन सख्या भावांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये एकाच कुटंबातील अकरा जणांचा समावेश आहे. कोरोना बाधीत झालेले बहुतांश रुग्ण बरे होवून घरी परतले आहे.मात्र, तीन सख्या भावांवर काळाने झडप घातली. आठ दिवसात काही दिवसांच्या फरकाने तीनही भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
दरम्यान आरोग्य विभागाच्या वतीने आशा वर्कस यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. यामध्ये कुटुंबात व्यक्तींमध्ये सर्दी, खोकला, ताप आदींची माहीती घेतली जात आहे.’ अशी माहीती आरोग्य सेवक भिमराव बडे यांनी दिली.