#Vaccination

बीड जिल्ह्यातील 20 खाजगी हॉस्पिटल्स ला कोरोना लसीकरणाची मान्यता…….!

बीड दि. 28 –  मागच्या 16 तारखेपासून कोव्हिड योध्यांना लसीकरणास सुरुवात झालेली आहे. तर उद्यापासून दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये आणखी व्यापकता येण्यासाठी देशातील कांही प्रमुख खाजगी हॉस्पिटलला लसीकरणाची मान्यता दिली असून लवकरच खाजगी हॉस्पिटलमध्ये अधिकृत लसीकरणाला सुरुवात होईल. बीड जिल्ह्यातही एकूण 20 खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे.
             दरम्यान बीड शहरातील यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल, काकू नाना हॉस्पिटल, विठाई हॉस्पिटल, तिडके हॉस्पिटल, प्रशांत हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल, पॅराडाईज हॉस्पिटल,  वीर हॉस्पिटल, शुभदा हॉस्पिटल, लाईफ लाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कृष्णा हॉस्पिटल, केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर हॉस्पिटल, माणिक हॉस्पिटल गेवराई तर केज शहरातील योगिता नर्सिंग होम,  माजलगाव येथील यशवंत हॉस्पिटल व साबळे हॉस्पिटल. तसेच परळी येथील मुंडे चिल्ड्रेन हॉस्पिटल, श्री. संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल, कराड हॉस्पिटल आणि पार्वती नर्सिंग होम इत्यादी हॉस्पिटल्स चा समावेश आहे.
          सदरील हॉस्पिटलमध्ये केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या किंमतीत लस देण्यात येणार असून लसीकरणासाठी 250 ते 350 रुपये एवढा खर्च येण्याची शक्यता आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close