क्राइम

युसुफवडगाव व केज पोलीसात दोन वेगवेगळ्या प्रकरणी गुन्हे दाखल…….!  

 केज दि.२ – माहेरहून घर बांधकामासाठी एक लाख रुपये घेऊन का येत नाहीस या कारणावरून एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करीत तिला घराबाहेर काढले. याप्रकरणी पती, सासू, सासऱ्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
                केज शहरातील क्रांती नगर माहेर असलेल्या एका 27 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून सदरील महिलेचा पती सचिन पेठे, सासू आशाबाई पेठे, सासरा दादाराव पेठे रा.गावसुद ता.जि. उस्मानाबाद या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत.
  युसुफ वडगाव पोलीसात विनयभंग व ऍट्रोसिटी चा गुन्हा दाखल………!
          केज तालुक्यातील एका गावातील 30 वर्षीय महिलेला फोनवरून त्रास देऊन व घरात घुसून लज्जास्पद कृत्य केल्या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीसात राजेंद्र नामदेव लांडगे रा.पाथरा याच्या विरोधात विनयभंगाचा व ऍट्रोसिटी चा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास  केजचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये हे करत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close