#Accident

दुचाकी व मळीच्या टँकर चा अपघात एकाचा मृत्यू

केज दि.१७ – तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी हे अंबाजोगाई ला दुचाकीवरून जात असताना मळीच्या टँकर ची धडक बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
          तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी अशोक विठ्ठल गायकवाड (40) हे रात्री 9 च्या दरम्यान त्यांच्या दुचाकीवरून ( M H 44 – 3820) अंबाजोगाई ला नातेवाईकांकडे चालले होते.
        दरम्यान ते होळ पासून जवळ असलेल्या कोद्री फाट्याजवळील पुलावर मळीच्या टँकर ची आणि दुचाकीचा अपघात झाला. त्यात अशोक गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर बराचवेळ त्यांना उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. त्यांचा मृतदेह पीएम साठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आला असून त्यांच्या सोनि जवळा या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close